पुणे : राज्यात मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर यांच्यात आरोप-प्रत्यारोप टीका-टिपण्णी सुरु आहे. ‘माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहित नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला समोरचा उमेदवार कोण हे समजेल’, असे वक्तव्य श्रीरंग बारणे यांनी केलं होतं. बारणेंच्या या वक्तव्यावर आता संजोग वाघेरे यांनीही प्रत्युत्तर देताना बारणेंना रावणाची उपमा दिली आहे.
“श्रीरंग बारणे यांचे वक्तव्य हे बालिशपणाचे आहे. १९८७ पासून मी राजकारणात आणि समाजकारणात कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात राहात आहोत. तरी ते मला ओळखत नसतील, तर तो त्यांचा अहंकार आहे. रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये. त्याचप्रमाणे श्रीरंग बारणेंचा अहंकाराचा मतदार अंत करतील”, असा विश्वास व्यक्त करत संजोग वाघेरे यांनी बारणेंना रावणाची उपमा दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati Lok Sabha : अजितदादांची नवी चाल? बारामतीच्या हाय होल्टेज लढतीत अजितदादांची एन्ट्री
-आज भवानीमातेचा प्रकट दिन; जाणून घ्या आजच्या दिवसाचे काय महत्व?
-“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी
-अखेर शरद पवारांनी ‘त्या’ वक्तव्यावर सोडले मौन, म्हणाले “अजित पवारांचा विधानावर मी फक्त….”
-दरवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरीपेक्षा जास्तच पाऊस; मोसमी पावसाळ्याचा हवामान खात्याने वर्तवला अंदाज