पुणे : राज्यातील मावळ लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात मुख्य लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरंग बारणे यांनी प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे यांना कोणतेही आव्हान नसल्याचे सांगितले आहे. कासारवाडी येथे प्रचाराची माहिती देताना श्रीरंग बारणे बोलत होते.
‘मावळ लोकसभा मतदारसंघातील २५ लाख मतदार माझे नातेवाईक आहेत. ही देशाची निवडणूक असून नात्यागोत्यावर, भावनिक मुद्यावर होणार नाही. समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही’, असे म्हणत श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांचे कोणतेही आव्हान नसल्याचे सांगितले आहे. त्यानंतर “माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढू नका, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर समोर कोण उमेदवार आहे, हे स्पष्ट होईल”, असेही श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
“प्रचारासाठी राज्यातील, केंद्रातील नेते येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पिंपरी-चिंचवड शहरात सभा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पनवेलला सभा होईल. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मावळमध्ये सभा होणार आहे. मागीलवेळी साडेसात लाख मते पडली होती. मागच्यावेळीपेक्षा जास्त मताधिक्य असेल याची खात्री आहे”, असे श्रीरंग बारणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-डोक्यावर रखरखते ऊन तरीही सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू! धायरीत महिलांनी केलं जंगी स्वागत
-“कोल्हेंवर टीका करणं हे दुर्दैवी, वैयक्तिकरित्या टीका करणे हा लोकशाहीत..”- सुप्रिया सुळे
-एक आवाहन अन् हेमंत रासने यांच्या वाढदिवसाला संकलित झाल्या तीस हजार वह्या