पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करताना दिसत आहेत. प्रचाराला काहीच दिवस शिल्लक असताना थेट टीका करताना दिसत आहे. त्यातच मी तर मावळ लोकसभेतील अनोळखी उमेदवार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळवलं होतं का? अशी मार्मिक टिप्पणी उमेदवार संजोग वाघेरेंनी केली आहे.
“अब की बार, फिरसे अप्पा बारणे खासदार” असा नारा बारणेंनी स्वतःसाठी दिला असला, तरी जनतेने “अब की बार, महाविकास आघाडीचा उमेदवार” हे ठरवलं आहे, असा ठाम विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे. ‘मी मोदींचा आदर करतो. त्यांच्यासंदर्भात मला काही टिपण्णी करायची नाही. बारणे जर समोरच्या उमेदवाराला ओखळत नाही तर त्यांनी मोदींना प्रचारासाठी यावं, असं मोदींना का सांगितलं. त्यासोबतच मोदींना सभेसाठी यावे लागते याच्यातच आपण ओळखून घ्यावं की त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतोय’, असा टोलाही त्यांनी बारणेंना लगावला आहे.
दिल्लीवरून ६ जणांचं पथक मावळ लोकसभेत येतात, यातूनच बारणेंवर महायुतीचा विश्वास राहिला नाही. हे स्पष्ट होतं. बारणेंसारखे नारे खूप मी ऐकलेले आहेत आणि याच्यामध्ये जनता मतदार राजा हा आपकी बार महाविकास आघाडी का उमेदवार असाच नारा आज मतदार राजांनी दिलेला आहे, असंही संजोग वाघेरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; मोहोळ म्हणाले, ‘कॉलेज लाईफचा जल्लोष अनुभवला’
-पूजा सावंतच्या ऑस्ट्रेलियाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज झाले विराजमान
-“अजितदादांच्या कामाचा आवाका अन् पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती”- सुनेत्रा पवार
-“कधी कधी वाटतं २००४ मध्येच हे करायला पाहिजे होतं”; इंदापूरच्या सभेत अजित पवारांचं वक्तव्यं