पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी १३ मे रोजी मतदान होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी आज पुणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो आयोजित केला आहे. या रोड-शोद्वारे एकनाथ शिंदे हे बारणेंचा प्रचार करत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
‘१३ तारखेला विरोधकांचे १२ वाजवणार’ अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली आहे. शहरातील चाफेकर चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. साडेतीन ते ४ तास चाललेल्या रॅलीमध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे हॅट्रिक नक्की करतील. बारणे यांना मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळते.
# Live📡| 11-05-2024 📍चिंचवड, पुणे
🎥 मावळ लोकसभा क्षेत्र | महायुती उमेदवार श्री श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित रॅलीतून लाईव्ह
https://t.co/0Ja6ESQgH4— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 11, 2024
‘अबकी बार आप्पा तिसरी बार खासदार’ मावळमध्ये ७५ ते ८० टक्के मतदान झाल्यास तुम्हाला मंत्रिपद देऊ. महाराष्ट्रात तिन्ही टप्प्यामध्ये महायुती सर्वात पुढे असून ४५ पार जागांवर जिंकणार. महिलांनी १३ तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हावे, त्याचबरोबर कुटुंबातील व्यक्तींना मतदानासाठी पाठवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आणि विधानसभेत महिलांना आरक्षण दिलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये संसदेत आणि विधानसभेत महिला दिसतील”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘जे कामाने निवडून येत नाही, ते जातीची ढाल पुढे करतात’; नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?
-“फ्लॉप ठरलेल्या कलाकाराला पुन्हा संधी द्यायची नाही…” फडणवीसांचा कोल्हेंवर प्रहार
-पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; पुढचे ४ दिवस वीजांच्या कडाकडासह पावसाची शक्यता
-‘मतदान करा अन् निम्म्या किमतीत खा ‘पॉट आईस्क्रिम’; पुण्यात मतदान जनजागृतीसाठी अनोखी शक्कल