पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांच्यात लढत होणार आहे. लोकसबा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघात बारणे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. यावेळ अजित पवारांनी आपल्या भाषणातून बारणेंचे प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
संजोग वाघेरे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते पण संजोग वाघेरे हे ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते. २०१९ मध्येही संजोग वाघेरे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तेव्हा मावळमधून पार्थ पवारांना उमेदवारी दिली. आता वाघेरेंना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे.
अजित पवार संजोग वाघेरे यांना उद्देशून काय म्हणाले?
“विरोधी उमेदवार कदाचित असं सांगेल की अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. असं अजिबात नाही, अख्खा महाराष्ट्र जाणतो मी असलं काही करत नाही. आपला उमेदवार हा श्रीरंग बारणे आहे, धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबा, भूलथापांना बळी पडू नका.”
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | ‘बारणेंचा प्रचार करणार नाही’; मावळात महायुतीच्या बैठकीत नाराजीचा सूर!
-Lok Sabha Election | शरद पवारांकडून दुष्काळी गावांची पाहणी; पाणी प्रश्वावरुन भाजपला धरणार धारेवर
-लोकसभेच्या तोंडावर देशातील डॉक्टरांचा मोठा निर्णय; देशात पहिल्यांदाच होणार दबाव गट