पुणे : होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मावळ मतदारसंघामध्ये २०१९ मध्ये झालेल्या राजकीय घटनेची या विधानसभेला देखील पुनरावृत्ती होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. २०१९ साली भाजपमध्ये असणाऱ्या सुनील शेळकेंना राष्ट्रवादीत घेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांना पराभवाची धूळ चारली. मात्र आता बदललेल्या राजकीय समीरकरणांनंतर आता मावळमध्ये सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवार हीच खेळी पुन्हा एकदा खेळणार असल्याची चर्चा आहे.
मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपच्याच रवी भेगडे आणि बापू भेगडे यांनी शड्डू ठोकला आहे. याचाच फायदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी घ्यायचा असल्याचं दिसत आहे. भाजपच्या रवी भेगडेंच्या हाती तुतारी देण्याचा पवारांचा पक्का प्लॅन झाल्याची मतदारसंघात चर्चा आहे. भाजपमध्ये झालेल्या अन्यायामुळे मावळ भाजपमधील युवक कार्यकर्ते, महिला आघाडी आणि मावळच्या जनतेचा मोठा पाठिंबा असणाऱ्या रवी भेगडेंना गळाला लावत शेळकेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची मोर्चेबांधणी सुरु आहे.
‘आता कसं, जनता म्हणेल तसं’ अशा आशयाचे बॅनर रवी भेगडे यांच्या समर्थनार्थ झळकले आहेत. त्यामुळे लवकरच मावळात राजकीय नाट्य पहायला मिळू शकते. मतदारसंघात रवी भेगडेंचे लागलेले बॅनर, त्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी हे सर्व चित्र पाहता भेगडेंना मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. या सर्व राजकीय घडामोडींमुळे मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे. अशातच शरद पवार रवी भेगडे यांच्यावर डाव खेळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रवी भेगडे हे हाती तुतारी हाती घेणार की ऐनवेळी आपला निर्णय बदलणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन
-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण
-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!
-राज्य सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट; आता मिळणार थेट टाटा कंपनीत नोकरी, पगार किती?