पुणे : पुणे शहरातील बावधन परिसरामधील शिंदे पेट्रोल पंपाच्या शेजारी शिंदे नगर सोसायटीमध्ये फोटोग्राफी स्टुडिओ गोडाऊनला आणि हिरा हाईट्स इमारतीला अचानक लागली. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात स्थानिक नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्रथमेश परकाळे यांनीही या मदतीचे कौतुक करत स्थानिकांचे आभार मानले आहेत.
स्टुडिओला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिकांना रेस्क्यू यांची मदत करण्यात आली असून कोणतीही जीवीत हानी झाली नाही. त्यांनी नागरिकांच्या एकजुटीला सलाम केला. फायर ब्रिगेडच्या सहकार्याने आणि नागरिकांच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली.
पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. या भीषण आगीतून ७ नागरिकांना धुरामधून बाहेर काढले असून प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले असून आता कुलींचं काम सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पुन्हा गारठणार! येत्या ५ दिवसात तापमानाचा पारा घसरणार
-बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा, चंद्रकांत पाटलांच्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना
-‘पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद हवंच’; भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
-पुण्याचा पालकमंत्री कोण? चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आपल्या सगळ्याच इच्छा पुर्ण होत नाहीत’