पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाची राज्यभर चांगलीच चर्चा झाली. या प्रकरणातील बड्या बापाचा मुलगा हा अल्पवयीन आरोपीला असून त्याला तात्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. २ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. एल. एन. धनवडे आणि कविता थोरात अशी या दोन सदस्यांची नावे आहेत.
आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून या दोघांची चौकशी करण्यात आली आणि त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. चौकशीत दोषी आढळल्यानंतर आता या दोघांना बाल हक्क न्याय मंडळावरून बडतर्फ करण्यात आलं आहे.
दरम्यान, पुण्यात मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिहण्यास सांगितले होते आणि पोलिसांसह २ आठवडे काम कर, अशी अट घालत त्याचा जामीन मंजूर केला होता. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
-रतन टाटांच्या प्रेयसीची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…
-पुणेकरांसाठी खुशखबर! 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली; पहा कसा करायचा अर्ज
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; संजय काकडे घेणार हाती ‘तुतारी’