पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती हिला समाज माध्यमातून धमकी देणारा आरोपी मार्शल लीलाकर याला येरवड्यातून अटक करण्यात आली. मार्शल लीलाकरला सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याने प्रकृती ठिक नसल्याचं सांगितलं. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने पोलिसांना गुंगारा देत पळ काढला होता.
ससून रुग्णालयातून तो पसार झाला. या घटनेची गंभीर दखल घेऊन सायबर पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. मार्शलला पकडण्यासाठी पोलिसांचे पथके नेरळ आणि कर्जतला रवाना झाली होती. मार्शल येरवडा भागात मावशीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले.
ससूनमधून पळ काढल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथकं रवाना केली होती. त्यावेळी पुणे पोलिसांना लीलाकर हा नेरुळ, कर्जतकडे जात असल्याची माहिती मिळाली. लीलाकरचा फोटो सगळ्या टीम्सला फॉरवर्ड करण्यात आला होता शिवाय या दरम्यानच्या सगळ्या पोलीस ठाण्यातील पोलिसांना देखील फॉरवर्ड करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस पथक दोन -तीन दिवस त्याच्या मागावर होतं.
पुणे शहरातील सगळ्या रेल्वे स्टेशनवरचे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले असता तो पुण्यात परत येत असल्याचं समजलं. पोलीस पथकाची त्याच्यावर २४ तास नजर होती. अखेर तो पुण्यात परत आला आणि पुण्यातील येरवडा परिसरात राहत असणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला. ही माहिती पोलिसांना मध्यरात्री मिळाली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांच्या मावशीच्या घरीच त्याला बेड्या ठोकल्या.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
-भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर
-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’
-‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना