पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला आहे. राज्यभरतील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक झाली नाही.
माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पुणे, नाशिकसह राज्यभरातील बाजार समित्या बंद आहेत. या बंदमुळे मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले आहे. बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. निषेधार्थ लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या आज बंद आहेत. शेतकरी, व्यापारी, अडतेदार, हमाल, व्यापाऱ्यांसह मार्केटमधील सर्व घटकांनी बंदला पाठिंबा दिला आहे.
परराज्यांतील शेतीमालाची आवक सोमवारी झाली. मात्र, पुणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
-“कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसणे असा…”; अजित पवारांनी जनतेला लिहलं पत्र
-शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त
-बारामतीत पोस्टर झळकले ‘सुनेत्रा पवार फिक्स खासदार’; अजित पवार गटाचा उमेदवार ठरला???
-ड्रग्ज रॅकेट: पुणे पोलिसांनी देशातील सर्वात मोठी कारवाई; फडणवीसांनी दिले २५ लाखांचे रोख बक्षीस
-मोहोळ, मुळीक की देवधर, माध्यमांच्या सर्व्हेत खासदारकीसाठी ‘हे’ नाव आघाडीवर