बारामती : राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बारामतीच्या विविध विकासाची पाहणी केली तसेच उद्घाटनही केले. यावेळी बारामतीमधील विकासकामे तसेच विकसीत रुप पाहून पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे तोंड भरुन कौतुक केल्याचे पहायला मिळाले आहे.
“काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. विशेष म्हणजे बारामतीचं काम सकाळी ६ वाजता सुरु होतं यामुळे खूप प्रभावित झाले आहे. बारामतीच्या विकासाशी त्यांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे”, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी मा. दादांचा अतूट निर्धार आणि बारामतीप्रती असलेले त्यांचे कटाक्षपूर्ण काम पाहून राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे भारावून गेल्या.
श्रीमती पंकजा मुंडे यांनी बारामतीत विविध विकासकामांची पाहणी केली आणि मतदारसंघातील प्रगतीचा आढावा… pic.twitter.com/QK3fi1DmLH
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) January 16, 2025
“अजित दादांचे प्रत्येक विकासकामांकडे असलेले सखोल लक्ष, काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा आणि उत्कृष्ट नियोजन या गोष्टी प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी आदर्शवत आहेत”, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. तसेच “बारामतीच्या सर्वांगीण विकासामध्ये अजितदादांचा विकासकामांचा निर्धार स्पष्टपणे जाणवतो. दादांसोबत काम करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याच बारामतीच्या धर्तीवर मराठवाड्याच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठीही मी प्रयत्नशील राहीन,” असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून कारवाईचा बडगा; माजी उपसरपंचाची गाडी केली जप्त
-आधी डिलिव्हरी बॉय बनून केली रेकी अन् नंतर…; पुणे पोलिसांची २०२५ मधील सर्वात मोठी कारवाई
-ऐकावं ते नवलंच! भूक लागली म्हणून चोरट्यांनी बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर नाहीच मिळाली पण…
-लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?