बारामती : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला. बारामतीमध्ये पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. बारामतीत शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यानंतर राज्यभर शरद पवारांच्या नावाची चर्चा रंगली. बारामतीमध्ये शरद पवारांनी बोलताना सुप्रिया सुळेंच्या वतीने देखील बोलले आहेत.
एका मुलीच्या बापाचे जगचे वेगळेच असते, एकच मुलगी असल्याने अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात, असे शरद पवार यांनी सांगितले आहे. बारामतीमध्ये आयोजित डॉक्टरांच्या कार्यक्रमात सभेला संबोधित करताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे.
सुप्रिया सुळे त्यांच्या मुलांसाठी लंडनला गेल्या आहेत, म्हणून त्या इथं येऊ शकल्या नाहीत. माझी मुलगी इथे हजर नाही, पण बापाचंच कौतुक चाललेलं आहे. मी मुलीचा बाप म्हणून इथे उपस्थित आहे. इथे एकच मुली असलेले बाप कोण आहेत? इतके असतील तर आपण आपला एक वेगळा ग्रुप करू. एकच मुलगी ज्या बापाला असते, त्यांचं जीणं एक वेगळंच असतं. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याचं लागतात, असे शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“तुम्ही नगरसेवक नसतानाही केलेलं काम…” सत्यजीत तांबेंची मोहोळांसाठी ‘खास’ पोस्ट
-शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद
-“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”
-पुण्यात तुबलेल्या पाण्याने नागिकांचे हाल; सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
-पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ