पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गटात विभाजन झाले. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. टीकी-टिपण्णी सुरुच आहे. मात्र आता अजित पवारांनी आज शिरुरच्या शेतकरी मेळाव्यामध्ये केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
“त्या त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या वडिलधाऱ्यांनीही असेच निर्णय घेतले आहेत. हे तुम्ही पाहिलं आहे. नदीचा काठ, रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहीत आहे. आपल्या वडिलधाऱ्यांनी सगळ्या सहन केल्या. आम्हीही राजकारणात आलो. संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परिने केला”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
“आता सरळ सरळ फाटी पडली आहे. आपण एका बाजूला ते (शरद पवार) एका बाजूला. त्यामुळे काहीजणं म्हणतात ही एकत्र येतील का रं? या चर्चांनी आमचे निम्मे गार होतील. दबकत बोलतात दादा काही होईल का? मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हे काही होणार नाही. मित्रांनो, मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका”, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“मी छाती ठोकपणे सांगतो, जानकर कुठेही जाणार नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
-‘नट-नट्यांचं राजकारणात काय काम?’; अजित पवारांनी उडवली अमोल कोल्हेंची खिल्ली
-कोथरुडमध्ये श्रमिकांसाठी मोफत ‘प्रेमाची न्याहारी’ उपक्रम; चंद्रकांत पाटलांनीही घेतला आस्वाद
-अजितदादांच्या स्वागताला हजेरी ते गाडीतून प्रवास, आढळराव पाटलांचं पक्क ठरलंय?
-महायुतीत मतभेद; चंद्रकांत पाटलांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना