पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आमरण उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पोलिसांकडून आता परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांसाठी हा मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षण मुद्द्यावरुन तातडीने निर्णय घ्यावा यासाठी मनोज जरांगे पाटील हे येत्या ८ तारखेपासून सराटीमध्ये उपोषण करणार होते. आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषण करणार होते. मात्र, आंतरवाली सराटी ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध करत त्यांना परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती केली होती.
आंतरवाली गावामधील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती. ग्रामस्थांच्या मागणीवरुन पोलिसांनी जरांगेंना उपोषण करण्यास परवानगी नाकारली आहे. आंतरवाली नंतर वडीगोद्री आणि दोडगाव येथील नागरिकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी नाकारण्यासाठी ग्रामस्थांनी तहसिलदांना पत्र दिले आहे. यामुळे जरांगे पाटलांना मोठा धक्का बसला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँन रन: रक्ताचे नमुने बदलण्याचा सल्ला कोणी दिला? धक्कादायक माहिती समोर
-Baramati | विजयानंतर सुप्रिया सुळे अजितदादांंच्या निवासस्थानी; म्हणाल्या…
-‘कोकणात जाऊन काही लोक…’; वसंत मोरेंचा मनसेला खोचक टोला
-कोण होणार पुण्याचा आरटीओ? ‘या’ दोघांच्या नावाची होतेय जोरदार चर्चा
-महाराष्ट्रात प्रथमच महिलांच्या हस्ते लाल महालात ३५० वा शिवराज्याभिषेक दीन साजरा