पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज राज्यभर पार पडत आहे. त्यातच आता मतदानाचे आवाहन करण्यासाठी पुण्यामध्ये खास ऑफर देणे सुरु आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पुण्यात विवध ठिकाणी वेगवेगळे ऑफर्स ठेवण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका आईस्क्रीम पार्लरमध्ये वोट केलेलं बोट दाखवून निम्म्या किमतीत देत आहेत. तर स्विगी फूड डिलिव्हरी अॅपने देखील पुणेकरांना हमखास सूट दिली आहे.
फळांचा राजा असलेल्या आंब्यांवरही आता पुणेकरांना खास ऑफर मिळत आहे. मतदान करण्यासाठी अनेक नागरिकांनी पुढे येऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी हे सगळे ऑफर्स ठेवण्यात आले आहेत. पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांनी देखील आता पुणेकरांना खास ऑफर देण्याचा निर्णय घेतला आहे. आंबा प्रेमींसाठी देसाई बंधू यांनी एक खास ऑफर ठेवलेली आहे. ७०० रुपये डझनाचा आंबा ३०० रुपयांनी मतदान केल्याची शाई दाखवून मिळणार आहेत. सकाळी ११ ते ६ वाजेपर्यत ही ऑफर असणार आहे.
पुणेकरांना भर उन्हाच्या कडाक्यात मतदान केलेले बोट दाखवले की अर्ध्या किमतीत आईसक्रीम मिळणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे, या हेतूने मतदान करणाऱ्या पुणेकर मतदाराना पुण्यातील प्रभात रस्त्यावर शिरीष ट्रेडर्सचे संस्थापक शिरीष बोधनी यांच्याकडून निम्म्या किमतीत पॉटआईस्क्रीमचा कप देण्यात येणार आहे. या ऑफरचा कालावधी सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यतच असणार आहे.
आजच्या दिवशी स्विगीकडून खास ऑफर देण्यात आली आहे. स्विगी डाइनआऊटची पुण्यात मतदानाच्या दिवशी आकर्षक डायनिंग ऑफर देणार आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवले तर त्यांना स्विगी डाईन आऊटवर ५० टक्क्यांची सूट मिळणार आहे. पुणेकर मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याच्या उद्देशाने पुणेकरांना विविध ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धंगेकरांचा आरोप बिनबुडाचा? पोलीस आयुक्तांनी सांगितलं सत्य; सहकारनगरमध्ये नेमकं काय घडलं?
-राज्यात ११ मतदारसंघात एकूण ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट; पहा पुण्यासाठी किती बॅलेट युनिट?
-पुण्यात उद्या होणार मतदान, निवडणूक आयोगाची जय्यत तयारी! पुणेकरांनो मतदान नक्की करा
-पुण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; बेकायदा दारु विक्री प्रकरणी ८३३ गुन्हे दाखल