पुणे : राज्यात सध्या उन्हाच्या झळा लवकर भासू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाळा असला तरीही पुणेकरांसाठी खुशखबर आहे. उन्हाळा वाढल्याने यंंदा आंबा लवकर तयार झाला असून बाजारात आंब्याची आवक वाढताना दिसू लागली आहे. त्यामुळे ग्राहकांना असल्ल कोणकणचा हापूस आंबा रास्त दरात मिळणार आहे. यासाठी ‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेवरील ‘राज्य कृषी पणन मंडळा’च्या २३ व्या हापूस आंबा महोत्सव सोमवार १ एप्रिल म्हणजे आजपासून पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
राज्य कृषी पणन मंडळासह व पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केसर आंबा उत्पादकांबरोबर जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गट सहभागी होत आहे. या महोत्सवात सुमारे १२५ स्टाॅल लागले आहेत.
पुण्यातील मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत हा महोत्सव सुरु आहे. आंबा महोत्सवात कोकण हापूस, मराठवाड्यातील केशर आंबा देखील उपलब्ध आहे. हा आंबा महोत्सव ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्याचा तसेच राज्याच्या विविध भागांतील केसर आंब्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन राज्य कृषी पणन मंडळाकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Shirur Lok Sabha | ‘वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही’; आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना धरलं धारेवर
-मोदीजींचे काम मतदारांपर्यंत पोहचवा! मोहोळांसाठी चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका