पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने बेकायदा आर्थिक व्यवहार (मनी लॅड्रिंग) प्रकरणी मंगळवारी छापे टाकले. ६ तासांपेक्षा जास्त वेळ ईडी आणि आय.टी.ने कारवाई केली. या कारवाईनंतर ईडीकडून रात्री उशिरा अटक करण्यात आली.
मंगळवारी पहाटे ईडीने सुरु केलेल्या कारवाईमध्ये मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानातून काही कागदपत्रे जप्त केली. बांदल यांच्या घरात १ कोटींची ४ घड्याळे आढळून आली. मंगलदास बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा ईडीने बांदल यांच्यावर अटकेची कारवाई केली.
मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. बांदल यांच्या दोन्ही निवासस्थानी ५ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम आढळून आल्या.
महत्वाच्या बातम्या-
-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’
-बदलापूरनंतर पुण्यातही धक्कादायक प्रकार; भवानी पेठेत शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
-तोंडाजवळ आलेला घास बँका घेतायत हिसकावून; लाडक्या बहिणींच्या पैशावर डल्ला
-मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी ईडी, इन्कम टॅक्सची कारवाई; पहाटेपासून कारवाई सुरु