पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातही विविध क्रीडा प्रकारांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन पुण्याला क्रीडानगरी करण्याचे ध्येय गाठणार असून पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना व्यक्त केला आहे.
‘खेळाडू हा कोणत्याही देशाचा कणा असतो. ज्या देशातील खेळाडू सशक्त आणि समाधानी, तो देश अधिकाअधिक प्रगती करू शकतो’, असा माझा विश्वास असून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकारांना उपलब्ध करुन दिलेले व्यासपीठ हे आंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी मैलाचा दगड ठरले आहे, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
पुण्याच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य कसे असावे, याबद्दल चर्चा करण्यासाठी पुणे स्पोर्ट्स असोसिएशन आणि सर्व फिटनेसप्रेमी पुणेकरांतर्फे विशेष ‘पुणे स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोहोळ बोलत होते. ‘खेळाडू म्हणून स्वत:ला घडविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, मेहनत घ्यावी लागते, याची मला जाणीव आहे. ते करताना अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्याची जबाबदारी घेऊन आपण सातत्याने घेत आलो आहे. यापुढे अधिक जोमाने घेईल, त्यासाठी कोणताही खेळाडू कुठेही अडता कामा नये,’ अशी आवाहनही मोहोळ यांनी दिले आहे.
‘पुण्याने राज्याला आणि देशालाही अनेक खेळाडू आजवर दिले आहेत. ज्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे नाव मोठे केले अशा खेळाडूंचे मार्गदर्शन घेत पुण्याची क्रीडा संस्कृती आणखी जोमाने पुढे नेण्याचाही आमचा प्रयत्न असणार आहे’, असेही मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
-मावळमध्ये महाविकास आघाडी, महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाधडणार
-महायुतीच्या सभेची नसरापूरमध्ये तयारी; पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक विस्कळीत