Health Care : अलिकडील काळात महिलांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा कामाच्या गडबडीत स्वत: कडे लक्ष देणं टाळतात. काही महिला आपल्या आरोग्याची तसेच शरीराची उत्तम काळजी घेत असतात. मात्र काहींना इच्छा असूनही स्वत:ची काळजी घेणे शक्य होत नाही. धकाधकीच्या जीवनात मुले, संसार, पार्टनर आणि जॉब या सगळ्यात आरोग्याची काळजी घेतली जात नाही.
तुम्ही जर स्वत:चीच काळजी घेतली नाही तर तुम्ही इतरांची काळजी कशी काय घेऊ शकता. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात महिला काम, घर आणि मुलं या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच अनेक शुल्लक आजारही त्या अंगावर काढतात. योग्य ते उपचार घेत नाहीत, तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही.
महिलांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तसेच काही महत्वाच्या वैद्यकीय चाचण्या नियमिक करुन योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. अशा काही आजारांकडे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अन्यथा या शुल्लक वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला भविष्यात लाखोंनी खर्च करायला लावतील.
महिलांनी प्रामुख्याने दरवर्षी करायच्या वैद्यकीय चाचण्या म्हणजे
ब्रेस्ट कॅन्सर टेस्ट
अलिकडे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या समस्येवर लवकर उपचार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. वयाच्या ४० व्या वर्षापासून दरवर्षी मॅमोग्राफी करणे आवश्यक आहे. ३० व्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला स्तनांची तपासणी केली पाहिजे आणि कोणत्याही प्रकारची सूज किंवा बदल जाणवत असेल तर डॉक्टरांशी बोलून यावर योग्य उपचार घ्यावेत.
ब्लड शुगर टेस्ट
अलिकडच्या फास्ट फूडच्या जमान्यातील खाद्यपदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. ज्यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वयाच्या ४५ व्या वर्षापासून दर ३ वर्षांनी रक्तातील साखरेची तपासणी करावी.
पॅप स्मीअर टेस्ट
ही चाचणी गर्भाशयाचा कर्करोग शोधण्यात मदत करते. ही टेस्ट वयाच्या २१ व्या वर्षापासून सुरू करावी आणि वयाच्या ६५ वर्षापर्यंत दर ३ वर्षांनी करावी.
व्हिटॅमिन बी-12 टेस्ट
महिलांमध्ये व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता अधिक सामान्य आहे. ज्यामुळे अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. मज्जासंस्था आणि हाडांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी-12 चे योग्य प्रमाण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, व्हिटॅमिन बी-12 ची पातळी तपासणे आवश्यक आहे.
थायरॉईड टेस्ट
थायरॉईड चाचणीथायरॉईड ही शरीरातील चयापचय क्रिया नियंत्रित करणारी ग्रंथी आहे. थायरॉईडची समस्या महिलांमध्ये सामान्य आहे. थायरॉईड टेस्टमध्ये शरीरातील थायरॉईड संप्रेरक पातळी तपासते.
ब्लड प्रेशर टेस्ट
उच्च, अतिउच्च रक्तदाबामुळे हृदयविकार आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढू शकतो. वयाच्या १८ व्या वर्षापासून दरवर्षी रक्तदाबाची तपासणी करावी.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण
-Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे
-पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप
-अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?