पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी मेळव्यात केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘भावनेच्या भरात घेतलेल्या निर्यणाचा पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे मी खेड-आळंदीच्या जनतेला सांगतो भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका’, असे अजित पवार म्हणाले.
‘महायुतीच्या जागावाटपामध्ये खेड-आळंदीची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुटली तर दिलीप मोहिते पाटलांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून द्या. ग्रामपंचायत ते आमदार इथंपर्यंत गाडी पोहचली आहे. आता लाल दिव्यापर्यंत गाडी पोहचण्यासाठी साथ द्या’, असे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवारांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, काही दिवस आम्हाला द्या. चुकलो तर कान पकडून जाब विचारा. तो तुमचा अधिकार आहे. पण भावनिकतेला बळी पडू नका. आता लोकसभेला जे झालं ते गंगेला मिळालं. आता विधानसभेला आम्हाला आशिर्वाद द्या, असेही आवाहन अजित पवारांनी खेळ-आळंदीच्या मतदारांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती
-गणरायाचे दर्शन अन् विधानसभेची साखरपेरणी, श्रीनाथ भिमाले थेट पोहचले ‘सागर’ बंगल्यावर
-अजित पवारांच्या मेळाव्याला आढळराव पाटलांची दांडी; पुन्हा शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?
-वनराज आंदेकर प्रकरण: गुन्हे शाखेकडून ८ पिस्तुलं १३ काडतुसे जप्त, अन्…
-पुणेकरांनो सावधान! एक कॉल तुमचं बँक अकाऊंट साफ करू शकतो; ८ महिन्यात २८ कोटींची लूट