पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पंतप्रधान पदाचा शपथविधी सोहळा झाला. या सोहळ्यामध्ये निवडून आलेल्या खासदारांनी मंत्रिदाची शपथ घेतली. तसेच पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे.
‘पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही’, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सणसणीत टोला लगावला आहे. मैं दुसरो के घर में क्यु झांक्यू’, असे म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळाले नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती युगेंद्र पवार यांना विधानसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याच्या जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘त्याबाबत मला माहीत नाही, मी दिल्लीत होते, कदाचित चर्चा असू शकते.’ “संघटनेचे नवं धोरणं सांगू. मी घराबाहेर पडले की, तुम्ही असता, घरी जाताना देखील तुम्ही असता, तुम्ही घरी जात की नाही. ५० खोक इज नॉट ओके, असं कार्यकर्त्यांनी जनतेनं दाखवून दिलंय, धनशक्तीला जनतेनं नाकारलं आहे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-फेलोशिपसाठी मराठी विद्यार्थ्यांचा लढा; ‘सारथी’ पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून कार्यालयासमोर आंदोलन
-एनडीएमधील धूसफूस चव्हाट्यावर; मंत्रिमंडळ विस्तारावर श्रीरंग बारणे काय म्हणाले?
-केंद्रातील मंत्रिपदाच्या बदल्यात अजित पवार गटाने केली ‘ही’ मोठी मागणी
-‘वादा तोच दादा नवा’! बारामतीत नव्या दादाची एन्ट्री; सर्वत्र झळकले पोस्टर्स
-एकाच पावसात उडाली पुणेकरांची दाणादाण, शहरात पावसाने नेमकी काय परिस्थिती?