पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची नसरापूर येथे जाहीर सभा सुरु आहे. बारामती लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये उपुमख्यमंत्री अजित पवार हे बोलत आहेत. भोर, वेल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी दिलं आहे.
“तुम्ही महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. नाही पुढच्या ५ वर्षामध्ये आताचं भोर वेल्हा आहे त्याच्यापेक्षा ५ पट विकास नाही केलं तर मला सांगा. भोर वेल्ह्यामध्ये एमआयडीसी आम्ही आणतो त्याशिवाय मत मागायला येणार नाही असं विरोधकांनी सांगितलं होतं तरीही मतं मागायला आलेत”, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
‘लग्नाच्य पंगतीला वाढप्या आपल्या ओळखीचा असला पाहिजे, तरच आपल्याला पोटभर जेवायला मिळतं. आता वाढप्या तुमच्या समोरच बोलतोय. भोर, वेल्ह्याचं ताट येऊ द्या नाय त्या ताटात जास्त टाकलं तर मग मला बोला. त्याबाबत मला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे’, असं म्हणत अजित पवारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नसरापूर, भोर येथिल शिवाजी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मैदानावर आयोजित महायुतीची जाहीर सभा सुरु आहे. या सभेत अजित पवार बोलत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल’; मुरलीधर मोहोळांचं आश्वासन
-…म्हणून आढळराव पाटील अन् अमोल कोल्हेंचं भोसरीकडे विशेष लक्ष
-शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?