पुणे : महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात चांगले यश मिळाल्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच तयारी सुरु केली आहे. येत्या विधानसभाही आपण बहुमताने जिंकू असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे.
पुण्यातून महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस, आणि ठाकरेंची शिवसेनेमधून इच्छुकांमध्ये रस्सीखेचही पहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांनी आज(बुधवारी) उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
📍शिवदर्शन, पुणे ⏭️ 21-08-2024
➡️ ‘राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग’चा वर्धापन दिन सोहळा – लाईव्ह
https://t.co/Ntam9hDcLZ— Supriya Sule (@supriya_sule) August 21, 2024
पुण्यात काही नेते हे मंत्री झालेले दिसतील असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुळेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आता अधिकच उत्साही वातावरण बघायला मिळत आहे. सुळेंनी केलेल्या वक्तव्याने मंचावर उपस्थित असणाऱ्या विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणारे आबा बागुल, अरविंद शिंदे, रमेश बागवे आणि प्रशांत जगताप यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटल्याचे दिसले.
महत्वाच्या बातम्या–
-भोसरी विधानसभेवरुन महाविकास आघाडीत मीठाचा खडा; महेश लांडगेंविरोधात कोण उतरणार निवडणुकीच्या रिंगणात?
-बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-मंगलदास बांदलांची वेळ खराब; १ कोटींचं घड्याळही गेलं अन् कोट्यावधींची मालमत्ताही, ईडीकडून अटक
-बदलापूर घटनेवर दीपक मानकर यांची संंतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, ‘…तर त्याला तोडला असता’