पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीला सर्व पक्षांच्या महत्वाच्या बैठका होत आहेत. त्यातच जागावाटपाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत. राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीमधील घटक पक्ष आपापल्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्या असून आता त्याप्रमाणे काही तात्पुरते फॉर्म्यले समोर आले आहेत. यामध्ये पुण्याता फॉर्म्युला देखील उच्च पातळीवर ठरला आहे. पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीला अपयश मिळाल्यानंतर पुण्यात विधानसभेला चांगले यश मिळवू, असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील ६ विधानसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी ८ विधानसभेच्या जागांसाठी आग्रह धरला आहे. मात्र, काँग्रेसने अद्यापही याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. स्थानिक नेत्यांनी ‘पुण्यात आपल्या पक्षाला ६ जागा मिळाव्यात’, अशी मागणी केली आहे.
पुण्यातील विधानसभेच्या जागांबाबत प्राथमिक चर्चा झाली असून या चर्चेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ३ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २ जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या जागावाटपाबाबत अंतिम चर्चेमध्ये कोणाला किती जागा मिळणार हे स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये यावरुन काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आजारी बहिणीला संपवलं अन् रचला बनाव, १८ वर्षीय भावाचं चीड आणणारे कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रवादी काँग्रेस आमदारच्या पुतण्यानं दोघांना चिरडलं
-प्रदेशाध्यक्ष पुण्यात अन् काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, अंतर्गत वाद चव्हाटयावर
-देशात पेपरफुटीविरोधी कायदा लागू; कारवाईची तरतूद काय असणार? वाचा सविस्तर…