पुणे : देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने अनेक जागांवर विजय मिळवत महायुतीची दाणादाण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाचे नाव, पक्षचिन्ह हे सोबत नेले मात्र तरीही अजित पवारांना एकाच जागेवर यश मिळाले आहे. याबाबत बोलताना शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे.
“अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं भविष्य काय ते मी सांगू शकत नाही, मला ठाऊक नाही”, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना एका जागेवर मिळालेल्या यशाबाबत वक्तव्य केले आहे. त्याबरोबर सरकारस्थापनेसाठी एनडीएचे खासदार तुमच्याबरोबर आले तर तुम्ही त्यांना घेणार का? या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
“मी आत्ताच हे सगळं काही सांगू शकत नाही. इंडिया आघाडीची बैठक होऊ द्या. त्यानंतर मी तुम्हाला याबाबत ठामपणे सांगू शकतो. उत्तर प्रदेशात काय झालं ते मला माहीत नाही. मात्र महाराष्ट्रात मोदी सरकारविषयी नाराजी होती. बेरोजगारीचा प्रश्न, महागाई हे प्रश्न होते. तसेच सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता आले नाही. मी हे मुद्दे भाषणांमध्येही मांडले होते. तसेच या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असंही म्हटलं होतं. मात्र मोदी सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्याचा फटका एनडीएला बसला आहे हे माझं निरीक्षण आहे.”
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात एनडीएला फटका का बसला? केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, ‘अजित पवार आमच्यासोबत…’
-मोहोळांनी गुलाल उधळला मात्र भाजपचे दोन आमदार ‘डेंजर झोन’मध्ये, गणित नेमकं कुठं फसलं?
-मुळशीचा स्वाभिमान, अभिमान पुणेकरांनी दिल्लीला पाठवला; मोहोळांच्या विजयावर मित्राची प्रतिक्रिया
-पुणे जिल्ह्यात महाविकास-महायुतीमध्ये टाय; प्रत्येकी 2 जागांवर उमेदवार विजयी