बुलढाणा | पुणे : जगातील ७ आश्चर्यकारक गोष्टींबाबत आपण नेहमीच ऐकत असतो. या ७ आश्चर्याच्या गोष्टींचा आपण कधी विचार करु शकत नाही. महाराष्ट्रात अशीच काहीशी आश्चर्याची गोष्ट समोर आली आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टनं सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. गर्भवती महिलेच्या पोटात गर्भ इथपर्यंत ठिक आहे, पण यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे आईच्या पोटातील बाळाच्या पोटातही एक बाळ असल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. आता ही माहिती वाचून तुम्हालाच काय सगळ्या महिला, डॉक्टर, तज्ञ तसेच वैद्यकीय संशोधकांना देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
नेमका काय प्रकार?
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एक ३२ वर्षीय गर्भवती महिला ३ दिवसांपूर्वी सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. ही महिला ३२ आठवड्यांची गर्भवती असून तिला आधी २ अपत्य आहेत. तिसऱ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेने नियमित तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गेली असता डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे महिलेने सोनोग्राफी केली. या सोनोग्राफीचा रिपोर्ट पाहून सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टारांना धक्का बसला. महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही एक गर्भ असल्याचे पाहून त्यांना विश्वास बसेना, म्हणून त्यांनी आपल्या सहकारी डॉक्टरांना बोलावून याबाबत माहिती दिली. त्यामध्ये ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भाच्या पोटातही आणखी एक गर्भ वाढत आहे.
डॉक्टर काय म्हणाले?
“बाळाच्या पोटात आणखी एक बाळ वाढण्याचा हा प्रकार अतिशय दुर्मिळ आहे. भारतात आजवर अशा दहा ते पंधरा तर जगात दोनशे घटनाची नोंद आहे. यापूर्वी १९८३ मध्ये अशी पहिली घटना उघडकीस आली होती. वैद्यकीय भाषेत अशा गर्भधारणेला ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति दुर्मिळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणत पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते.”
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र
-पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांची ACB कडून चौकशी
-खळबळजनक! पालकांची खोटी सही केल्याचं शिक्षकांना सांगितलं म्हणून त्याने थेट सुपारीच देत…
-गुरुनं ओलांडली मर्यादा; अल्पवयीन विद्यार्थीनीला केलं प्रपोज, नकार देतात…