पुणे : महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत अंत्म लढतीमध्ये महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्याने पंचानी पुण्याचा पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केलं आणि पृथ्वीराज मोहोळ हा ६७ वा महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र या कुस्ती स्पर्धेमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला. मॅटवरील कुस्ती प्रकारामध्ये पृथ्वीराज मोहळ विरुद्ध शिवराज राक्षे या दोघांमध्ये अंतिम सामना रंगला. अवघ्या ४० सेकंदात पृथ्वीराज मोहोळने शिवराज राक्षेला मॅटवर आपटलं. पंचांनी पृथ्वीराज मोहोळच्या बाजूने निर्णय दिला आणि तिथेच मोठ्या गोंधळाला सुरुवात झाली.
शिवराज राक्षेची पाठ पूर्ण टेकली नव्हती, आम्हाला निर्णय मान्य नाही, तुम्ही रिव्ह्यू पाहा अशी मागणी राक्षे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत मोहोळला विजयी घोषित केल्याने मोठा गोंधळ पहायला मिळाला. शिवराज राक्षेला चुकीचा निर्णय दिल्याचा राग अनावर झाल्याने राक्षेने पंचांची कॉलर धरली, अन् लाथही मारली. त्यामुळे आणखी गोंधळ झाला आणि कुस्तीगीर संघटनेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षाची निलंबनाची कारवाई केली आहे.
कुस्तीच्या आखाड्यातील हा गोंधळ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. यानंतर आता यावरुन राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील राक्षे यांच्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट राक्षे याची बाजू घेत त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे.
प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे.…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 3, 2025
“पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे. सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावाच शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज आहे”, असे रोहित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ३०० कोटींची संपत्ती? उघड चौकशीची मागणी
-‘लाडक्या बहिणीं’ना भरली धास्ती! निकषात न बसणाऱ्यांवर महिला योजनेचा लाभ नको म्हणून करु लागल्या अर्ज
-औंधमधील ‘त्या’ मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय; थायलंडसह महाराष्ट्रातील ९ तरुणी पोलिसांच्या ताब्यात
-Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज