पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून अनेक विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी वीजबील माफी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अशा एक ना अनेक योजनांची घोषणा करण्यात आली. लाडकी बहिण योजनेंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यात ७५०० हजार रुपये जमा देखील झाले. आता ही प्रतिमहिना १५०० रुपये देणाऱ्या या योजनेत बदल करुन ही रक्कम प्रतिमहिना २१०० रुपये करण्यात आली. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तर दुसरीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली तर दुधाच्या दरात ३ रुपयांनी घट झाल्याचे पहायला मिळाले आहे.
निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना सीएनजी दरात वाढ करण्यात आल्यानंतर आता ‘गोकुळ’कडून गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल ३ रुपयांची कपात करण्यात आली आहे. गोकुळकडून दूध उत्पादकाकडून गायीच्या दुधाची ३३ रुपयांनी खरेदी केली जात होती. आता गोकुळ गायीचे दूध प्रतिलीटर ३० रुपयांनी खरेदी करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्य सरकारकडून ऑक्टोबर २०२४ पासून गाय दूध खरेदीचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी प्रतिलिटर २८ रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ २७ ते २८ रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ ३३ रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर ६ रुपये जास्त आहे.
महत्वाच्या बातम्या-
-भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?
-पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? या ४ आमदारांची नावे चर्चेत
-विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपची सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ
-‘बारामतीचा एकच दादा’; अजितदादांनी शरद पवारांवर मात करत पुतण्याचा केला पराभव