पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी काही जागा सोडल्या तर जवळपास सर्वच जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. तर अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचाराला सुरवातही केली आहे. गुरुवारी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये पुण्यातील हडपसरमधून प्रशांत जगताप, आंबेगावमधून देवदत्त निकम, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे आणि बारामतीमधून युगेंद्र पवारांना उमेदवारी देण्यात आली. त्यापैकी हडपसर मतदारसंघात आता आघाडीत नाराजी नाट्य पहायला मिळत आहे.
हडपसरच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला होता. मात्र, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर चांगलेच नाराज झाले आहेत. जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महादेव बाबर हे उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. मात्र, भेटीवरही बाबर नाराज आहेत. आता ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी यापुढे पक्षाचे काम करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. ‘६ तास थांबलो फक्त ४० सेकंद आम्हाला दिले. उद्धव ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार केली आहे. महाविकास आघाडीतून त्यांना एकही जागा पुणे जिल्ह्यासाठी मिळवता आलेली नाही. शिवसेना ही फक्त मुंबई पुरती मर्यादित राहिली आहे. आम्ही सगळे शिवसैनिक नाराज आहोत बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म देखील पुण्यात झाला. मात्र, आज एकही जागा आम्हाला पुण्यात मिळत नाही” असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
“केवळ मीच नाहीतर अख्खा पुणे जिल्हा नाराज आहे. शिवसैनिक नाराज आहेत. जिल्ह्यात अजुन एकही मशालचा उमेदवार दिला नाही, मग शिवसैनिकांनी काम कसं करायचं?” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, आता मला कोणाचाही निरोप येऊ द्या मी आघाडीचं काम करणार नाही. ज्यांना आपलं देणं घेणं नाही. त्यांचं घेणं देणं असण्याचं काही कारणच नाही”, असे महादेव बाबर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; बारामतीत काका-पुतण्या भिडणार
-२०१९ ला संधी हुकली पण शरद पवारांनी यंदा दिली ताकद, प्रशांत जगताप हडपसरच्या मैदानात