पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये २६ वर्षीय तरुणीवर पहाटेच्या अंधाराचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंद पडलेल्या बसमध्ये पहाटे हा प्रकार झाल्यानंतर पीडित तरुणी गावी निघाली होती मात्र, मध्यरस्त्यातून पुन्हा स्वारगेटला आली आणि घडला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने यंत्रणा हालवत पोलिसांची ८ पथके तयार करत आरोपीचा शोध सुरु केला आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता राज्य परिवहन मंत्री तथा पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात आज घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेतील आरोपीला तत्काळ अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. स्वारगेट स्थानकात यापूर्वी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यात अजून सुधारणा करण्यात येईल. तसेच परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रवाशांच्या सुरक्षा यंत्रणेसंबंधी विस्तृत आढावा घेऊन विशेषत: महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यात अधिक सुधारणा करण्यात येईल, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, आरोपी अद्याप फरार असून पुणे पोलिसांनी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित तरुणीची प्रकृती स्थीर असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच तिच्या इतर मेडिकल टेस्ट करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-स्वारगेट अत्याचार प्रकरण: फरार आरोपीचा फोटो व्हायरल, भावाला घेतलं ताब्यात
-अजितदादांच्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची मुजोरी, जन्मदात्या आईला केली मारहाण, नेमकं प्रकरण काय?