पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा गुरुवारी लोणावळ्यात कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात न जाण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके (अजित पवार गट) कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याची तक्रार स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यावर या मेळाव्यात शरद पवारांनी भर सभेत मंचावरुन सुनील शेळकेंना तंबी दिली. यावरून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान खडाजंगी सुरु झाली आहे.
शरद पवारांनी सज्जड दम दिला की ताबडतो सुनील शेळके यांनी मी कोणालाही दमदाटी केली नाही. केली असल्यास त्यांचे नंबर द्या मी फोन करुन माफी मागतो अशी प्रतिक्रिया शेळकेंनी दिली. ‘पवारसाहेबांना भेटून त्याबाबत विचारणा करणार आहे’, असंही सुनील शेळके म्हणाले आहेत. त्यावर शरद पवार राष्ट्रवादीचे मावळातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन बाफना आक्रमक झाले.
‘सत्तेच्या अहंकारामुळे शेळकेंच्या डोक्यात हवा गेली आहे. तो काय साहेबांना विचारणार, त्याची लायकी आहे का? तो साहेबांना काय भेटतो, मी देतो पुरावे. तालुक्यात मी प्रमुख असताना मला पहिलं विचारायला पाहिजे. त्याऐवजी तो (शेळके) थेट शरद पवारांकडे जातोच कसा? पहिलं खालचं कोर्ट, मग हायकोर्ट, थेट सुप्रीम कोर्टात कसा जातो?, असा सवाल करत मदन बाफना यांनी सुनील शेळकेंची लायकी काढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ब्रेक्रिंग! रोहित पवारांना ईडीचा दणका; बारामती अॅग्रोच्या खरेदीचा कारखाना जप्त
-पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न आता पुर्ण होणार; म्हाडाच्या ४ हजार ८८२ घरांसाठी लॉटरी जाहीर
-लोकसभा निवडणुकीसाठी ‘धकधक गर्ल’ माधुरीला भाजपची ऑफर??; म्हणाली, ‘मी…’
-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती