पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी अवघे ४ दिवस बाकी आहेत. सर्वत्र गणेशोत्सवाची जंगी तयारी सुरु आहे. हा गणेशोत्सव कोणत्याही नियमांच्या उल्लंघन न करता पार पाडला जावा यासाठी भाजप नेत्या आणि राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे.
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि श्री गणेशासमोर बीभत्स गाणी लावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या हिंदू धर्माला, आपल्या देवी-देवतांना आवडतील का, याचा विचार करून गाणी निवडूया. उत्सवातील ‘आव्वाजा’वर नियंत्रण ठेवायला हवे, असे आवाहन करत मेधा कुलकर्णी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.
गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना कळकळीचे विनम्र आवाहन 🚩#ganeshfestival #ganeshotsav #hindu #hindufestival pic.twitter.com/LpQRFZr1x2
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) September 3, 2024
‘ढोल-ताशा हे आपले पारंपरिक वाद्य आहे. त्यात ताल आहे. पण, वादकांची संख्या मर्यादित ठेवूनही त्यात गोडवा टिकवला जाऊ शकतो. गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा आणि गाण्यांची निवड याबाबत काटेकोर राहण्याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी,’असे आवाहन देखील कुलकर्णी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नाना पटोलेंसाठी भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा अन् बागुलांना उमेदवारी देण्याची मागणी
-…म्हणून पालिकेने गणेश मूर्ती विक्रेते अन् मंडळांना धाडल्या नोटीसा; वाचा कारण काय?
-महायुतीत वडगाव शेरीवरुन खडाजंगी; भाजप-राष्ट्रवादीचा वाद शिगेला, नेमकं कारण काय?
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेकडून रस्तांची मलमपट्टी; ९ दिवसांत किती खड्डे बुडवले?