पुणे: आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला मनःशांतीची अत्यंत गरज असून यासाठी मेडिटेशन करण्याकडे कल दिसून येतो. मेडीटेशन म्हणजे मन आणि शरीर यामधील संतुलन प्रस्थापित करण्याचा प्रभावी मार्ग. याच्या माध्यमातून मानसिक शांतता, सकारात्मक विचार, आणि आत्मशुद्धी साध्य होते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेली 70 वर्षाहून अधिक काळ देशभरात विविध ठिकाणी होत असणारा भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सव यंदा पुणे शहरात आयोजित करण्यात आला आहे.
विश्वविधाता ऋषभ फकीर सेवा ट्रस्ट आलपाचे फकीर चरणोपासक अरविंद उर्फ पप्पूशेठ कोठारी आणि राजेश परमार यांच्या माध्यमातून ४ जानेवारी रोजी एसपीकेजीएस नंदू भवन, पीजी हायस्कूलच्या बाजूला, आई माता मंदिर जवळ, कोंढवा बुद्रुक येथे भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” पंचमी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये धर्मविरहित भक्ती – पूजा आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून मेडिटेशन केले जाणार आहे.
भगवान श्री ऋषभ फकीर “नीलमणी” हे अध्यात्मिक क्षेत्रातील एक महान विभूती होते. त्यांनी मानवजातीला शांतता, सत्य, आणि साधनेचा मार्ग दाखवला. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळापासून त्यांचे “नीलमणी पंचमी महोत्सव” विविध ठिकाणी साजरा केला जातो. त्यांचे विचार आणि शिकवण आजही लाखो लोकांना आत्मविकासाचा मार्ग दाखवत आहेत. सर्व साधकांना तसेच सामान्य नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होऊन भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या शिकवणीचा अनुभव घेण्याचे आवाहन अरविंद उर्फ पप्पूशेठ कोठारी यांनी केले आहे.