पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका पदाधिकाऱ्याने अतिशय खालची पातळी गाठत जन्मादात्र्या आईला मानसिक आणि शारिरीक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईच्या पाठीवर, हातावर, मानेवर मारल्याचे वण उमटले आहेत. मारहाण करणाऱ्या मुलाचे मारुती देशमुख असे नाव असून नुकतीच त्यांची मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हेच मारुती देशमुख हे कार्ला येथिल एकविरा देवी ट्रस्टचे विश्वस्त आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, मारुती देशमुख यांनी २ दिवसांपूर्वी राहत्या घरात आपल्या आईला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मारुती देशमुख यांची आई सावित्रीबाई या ७-८ महिन्यांपूर्वी मारुती आणि दुसरा मुलगा विलास देशमुखांकडे राहायला आल्या. त्याआधी त्या पुण्यात राहणाऱ्या लहान मुलगा राजेंद्र देशमुख यांच्याकडे राहत होत्या. मात्र, आता मूळगावी देवघर या ठिकाणी जायचा हट्ट धरला आणि त्या तिथं राहायला आल्या. मात्र, आई आपल्याकडे राहायला आली हे मारुती देशमुख आणि कुटुंबियांना नको होते. आईने पुन्हा लहान भावाकडे पुण्यात रहायला जावे म्हणून मानसिक आणि शारिरीक छळ केला, असा आरोप राजेंद्र देशमुख यांनी केला आहे.
सावित्रीबाई यांनी मुलाने आपल्याला मारहाण केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांत मुलगा मारुती, त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात केला आहे. आईला मारणारे मारुती देशमुख हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून अजित पवार सत्तेत असल्याचा गैरफायदा त्यांचे समर्थक घेत असल्याचे दिसूय येत आहे.
दरम्यान, ‘माझ्या पक्षातील कोणी कायदा हातात घेतला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल करा’, असा आदेश अजित पवारांनी आधीच दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला आहे, पण तो अदखलपात्र गुन्हा आहे. जन्मदेणाऱ्या आईचा मानसिक आणि शारिरीक छळ करणाऱ्या मुलाला बेड्या ठोकणे आणि अजित पवारांनी पक्षातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. मात्र, आता अजित पवार कायदेशीर तसेच पक्षातंर्गत कारवाईचे आदेश देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-गुंडगिरीला वैतागले कोथरुडकर; चौकाचौकात बॅनरबाजी, काय आहे बॅनरवर?
-पुण्यातील टोळीचा म्होरक्या, कुख्यात गुंड गजा मारणेनं गुन्हेगारीला सुरवात कशी केली?
-नीलम गोऱ्हेंविरोधात आंदोलन करणाऱ्या महिला शिंदेसेनेत जाणार! नेमकं कारण काय?
-“स्थायी समिती सदस्य होण्यासाठी माझ्याकडे राऊतांनी २५ लाखांची मागणी” शिंदेसेनेचा गंभीर आरोप
-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी कधी?