पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस कडून आज महाराष्ट्रासह देशभरातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अपेक्षेप्रमाणे पुण्यातून धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून गेल्या आठवड्यातच माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी जोरदार प्रचार देखील सुरू केला. मात्र काँग्रेसमध्ये असणारी इच्छुकांची स्पर्धा पाहता उमेदवारी कधी जाहीर होणार आणि कोणाला मिळणार हा प्रश्न कायम होता. अखेर आज धनगर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
-‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे
-“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना