पुणे : पुणे लोकसभा निवडणूक साठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर करून एक आठवडा उलटला तरी काँग्रेसमध्ये मात्र उमेदवारी निश्चित करण्यावरून आणखीनही संभ्रमावस्था दिसत आहे. कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र दुसरीकडे पक्षात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिली जावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदारसंघांची पूर्वनियोजित बैठक झाली. माजी उपमहापौर श्री. आबा बागुल यांनी या पूर्वनियोजित बैठकीचे आयोजन केले होते. मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीत जर निष्ठावंतांना डावलले जात असेल तर कार्य कसे करायचे, असा थेट सवाल पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निरीक्षकांना विचारला.
ज्यांनी आजवर पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केले. त्यांनाच बाजूला सारण्याचे राजकारण होत असेल तर आता पक्षाच्या श्रेष्ठींनी निष्ठावंत म्हणजे काय? याची व्याख्या जाहीररीत्या सांगावी. अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, “गेल्या चाळीस वर्षांपासून मी समाजकारण आणि राजकारणात कार्यरत आहे. काँग्रेसचा निष्ठावंत आहे. सलग ३० वर्षे निवडून येत असून विकासाला सदैव प्राधान्य दिले आहे. पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात रुजवली आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षात मरगळ होती. त्यामुळे जाहीर सभा घ्या आणि पुणेकरांचा कौल घेवून उमेदवार ठरवा, हे पत्र दिले मात्र त्याला लेटर बॉम्बचे स्वरूप दिले मात्र काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत आहे हे वातावरण निर्माण झाले. ते पत्र जर लेटर बॉम्ब होते मग आता पुढे पहा काय होते”
महत्वाच्या बातम्या-
-‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे
-“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना
-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला
-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास
-मावळमध्ये महायुतीचा तिढा कायम; ‘बारणेंना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही’