पुणे : मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करुन वसंत मोरे यांनी आपल्या पुढील राजकीय वाटचालीसाठी कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्याप स्पष्ट केले नाही. मात्र काल (गुरुवारी) वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांची पुण्यातील पक्षकार्यालयात भेट घेतली. यावरुन वसंत मोरे हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकारणात रंगल्या. तोच आज वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची मुंबईत जाऊन भेट घेतली यावरुन आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
वसंत मोरे यांच्या राजीनाम्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील धडाधड राजीनामे दिले. वसंत मोरे हे राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. संजय राऊतांच्या भेटीनंतर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“अजून भेटीगाठी सुरु आहेत. पण या सगळ्या भेटीगाठी मी उघडपणे घेत आहे. बंद दरवाजे ठेवून मी कोणत्याही भेटीगाठी घेत नाही. सगळ्या चर्चा सकारात्मक होत आहेत. सर्वचजण विचार करतील. मला पुण्याची लोकसभा निवडणूक लढवायची आहे,यावर मी ठाम आहे यासाठी मी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेट घेत आहे. संजय राऊत, शरद पवार यांच्या भेटी मी घेतल्या ते सुद्धा सकारात्मक आहेत. पुण्यात वॉशिंग मशीन नको, मी सुद्धा याच मताचा आहे. शरद पवारांना भेटलो” असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
“पुण्याची जागा काँग्रेसकडे जरी असली तरी त्या ठिकाणची नेत्यांशी माझा समन्वय आहे त्यांच्या मी संपर्कात आहे. आमदार रविंद्र धंगेकरांशी मी फोन केला आहे. काँग्रेसकडे जागा आहे, मोहन जोशींनी भेटलो. रवींद्र धनगेकरांसोबत फोनवरुन बोलणं झालं आहे. पुण्याला गेल्यावर भाऊला भेटेन. ते देखील माझ्या भूमिकेला साध देतील”, असा विश्वास वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘निलेशला मीच पक्षात आणलं, मनापासून आधार दिला’; लंकेंच्या पक्षप्रवेशावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-“माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी”; सुप्रिया सुळेंचा अजितदादा गटाला इशारा
-“उद्या म्हणाल अजितदादांच्या शिपायाला मत द्या, नीच प्रवृत्ती असलेले समाजात..” शिवतारे पुन्हा आक्रमक
-‘मी मावळमध्ये शिवसेनेकडूनच लढणार’; श्रीरंग बारणेंची स्पष्टोक्ती
-‘भाजपला आणखी ४ जागा मिळणार, बारामतीची जागा अजितदादांनाच’- चंद्रकांत पाटील