पुणे : राज्यातील राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. प्रत्येक उमेदवार दारोदारी जात मतदारांना आवाहन करत आहेत. आश्वासनं देत आहेत. निवडणुका तोंडावर आल्याने मतदारांचे प्रश्नही जाणून घेताना दिसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्येक मतदाराला निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. मात्र राज्यातील बारामती, शिरुर, आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
शिरुर, बारामती आणि मावळ मतदारसंघातील नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी मतदारांनी बहिष्कार टाकला आहे. रस्ते, पाणी, मराठा आरक्षण, रेल्वे गाडी या मागण्यांचा त्यात समावेश आहे. यासोबतच राज्यात तब्बल ६५ गावातील ४१ हजार ४४० मतदारांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मतदारांची संख्या अधिक आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पान्हवळ गावातील १२०० ते १३०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यातच मोकाट जनावरांमुळे शेतीचे नुकसान होत असल्याने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी मोढवे गावातील २ हजार ७०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. दौंड शहराला उपनगरचा दर्जा द्यावा, लोकल सुरू करावा आणि उड्डाण पुलाच्या मागणीसाठी ३ हजार ते ३ हजार ५०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
मावळ मतदारसंघात एकूण ५०० ते ५५० मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात भुयारी मार्गाच्या मागणीसाठी खोडद, हिवरे, नारायणगाव गावातील १२०० ते १३०० मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय! मग मुरलीधर अण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा’ – शिरोळे
-प्रसाद ओकला करायचाय शरद पवारांवर बायोटेक; म्हणाला “शरद पवार महाराष्ट्रातील…”
-पुण्यात पुलाचं काम सुरु असताना आढळला रणगाड्याचा बॉम्ब; संरक्षण विभागाकडून पाहणी सुरु