पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे लढणार आहेत. शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने बारामतीत आता तिहेरी लढत रंगणार असल्याचं चित्र स्पष्ट आहे. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे बारामती मतदार संघाच्या रिंगणात उतरणार आहेत. यावरून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“विजय शिवतारे प्रचंड खालच्या पातळीवरचे वक्तव्य करत आहे. त्यामुळे त्यांना महायुतीत त्यांना का ठेवलं आहे, हे पाहावं लागणार आहे. शिवतारेंचे कार्यकर्तेदेखील गुंडेशाहीची भाषा करताना दिसत आहे. त्यामुळे शिवतारेंना नेमकं कोणाचं पाठबळ आहे हे पाहावं लागणार आहे. मला त्यांच्या तब्येतीची फार काळजी आहे… ते असं का वागत आहेत? परिवारात वैफल्यग्रस्त असतो त्यावेळेस अशा प्रकारचे विधान होत असतात. त्यांनी निवडणूक लढवावी यावेळेस त्यांचा डिपॉझिट ही वाचणार नाही. अजितदादांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल तर तो घ्यावा”, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
“काही दिवसांपूर्वी शिवतारे अजित पवारांसमोर लोटांगण घातल होते. तेच शिवतारे आता अजितदादांवर हल्लाबोल करत आहेत. विजय शिवतारे यांची कुवत आम्हाला माहिती आहे. विजय शिवतारेची एवढी औकातच नाही की तो एवढा बोलेन.. शिवतारेंच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामती ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ. त्यावेळेस तो मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेसमोर आणूच. काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा”, असा इशाराच मिटकरींनी विजय शिवतारेंना दिला आहे.
“तुम्ही कितीही चक्रव्यूह आखा पण, बारामतीचा नागरिक अजित पवारांच्या पाठीशी आहे, असं म्हणत बारामती मतदारसंघावर अजित पवार गटाचच वर्चस्व असेल” असंच मिटकरी यांनी ठामपणे सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Election | अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर; पुण्यात महत्वाची बैठक
-Summer | पुण्यात उष्णतेचा तडाका वाढला, पारा ४१ डिग्रीच्यावर; अशी घ्या काळजी