पुणे : देशात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यातील सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. राज्यातील अनेक राजकीय पक्षांकडून काही जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ महिन्यापूंर्वी बाहेर पडून (सेना-भाजप) शिंदे-फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा देत सत्तेत गेले.
अजित पवारांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या विरोधात प्रचार करत खासदार सप्रिया सुळेंची साथ दिली आहे. अजित पवारांचे दोन्ही पुतणे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी प्रचारसभांमध्ये अजित पवारांवर टीका केली. प्रचारासाठी दौरे करत मतदार संघात फिरून मतदारांची संवाद साधत आहेत. या दरम्यान काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार, युगेंद्र पवार यांना आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांकडे केली आहे. पुणे ग्रामीण पोलिसचे अधीक्षक पंकज देशमुख यांना सुळे यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
सुप्रिया सुळेंचं पोलीस अधीक्षकांना पत्र
“लोकसभा निवडणूक प्रचारार्थ आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु, काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे,” असं सुप्रिया सुळेंनी म्हणाल्या आहेत.
आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना लिहीले आहे. या पत्राची ते अवश्य दखल घेतील हा विश्वास आहे.@puneruralpolice pic.twitter.com/orKLDJG7Ni
— Supriya Sule (@supriya_sule) March 21, 2024
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यांनी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडणं शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे. सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो,” असं सुप्रिया सुळे पत्रात म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’
-‘पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील’; पंकजा मुंडेंचा विश्वास
-काँग्रेस अखेर ठरलं! आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर