पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी सुरु आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना शरद पवारांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांना मंचावरुनच तंबी दिली होती. शरद पवारांच्या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ‘शरद पवारांनी आपला स्तर पडू देऊ नये’ असं सांगितलं. यावरुन आता बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांचा समाचार घेतला आहे.
“राजकारणात एखाद्याचा स्तर हा समाज ठरवत असतो. समाजातलं आपलं स्थान हे जनता ठरवत असते. हर्षवर्धन पाटील राज्याचे नेते आहेत. हर्षवर्धन पाटलांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून धमक्या येत आहे, असं त्या पत्रात लिहिलं आहे. मात्र धमकी द्यायची हिंमत होते, म्हणजेच हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे. वरिष्ठ नेते मदन बाफना यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे ‘अब की बार गोळीबार सरकारट, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सत्तेत असलेले आमदार गोळीबार करत आहेत, नेमकं राज्यात चाललंय काय?”, असा सवाल करत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.
आज सर्वत्र गोळीबार, गुंडगिरी आणि ड्रग्सचे गुन्ह्यांचा गदारोळ झालेला असताना गृहमंत्री इतरांवर आरोप करत फिरत आहेत, ही दुर्देवाची बाब आहे.#Maharashtra #MaharashtraCrimes #SupriyaSule #NCP pic.twitter.com/ndKvmyVuCe
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 8, 2024
“शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात ड्रग्स सापडत आहे. करोडोंचं ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केलं. राज्यात असे प्रकार सुरु आहे याला गृहखातं जबाबदार आहे. फडणवीसांनी चांगलं काम केलं असतं तर आम्हाला फडणवीसांना बोलायची वेळच आली नसती. हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे खोके सरकार आहे, गोळीबार सरकार आहे आणि धमकीबाज सरकार आहे. विरोधकांपासून ते मित्रपक्षांपर्यंत सगळ्यांनाच हे सरकार धमक्या देतात”, असे आरोपही यावेळी सुप्रिया सुळेंनी भाजपवर केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती
-‘शेळकेंचा अहंकार वाढलाय, मावळची जनता त्यांचा अहंकार नक्कीच उतरवणार’; रोहित पवारांची प्रतिक्रिया
-पुणे-सुरत प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; पुणे-सुरत थेट विमानसेवा लवकरच सुरु होणार
-जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात बससेवा मोफत; पीएमपीएमएलकडून खास गिफ्ट