पुणे : काँग्रेस पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती झाली. त्यानंतर पुण्यातील काँग्रेस भवन येथे पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदे घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, अनंत गाडगीळ, दीप्ती चवधरी, माजी महापौर कमल व्यवहारे, वीरेंद्र किराड या वेळी उपस्थित होते.
“इडी, सीबीआयनंतर आता इन्कम टॅक्स विभागाला हाताशी धरून मोदी सरकारने बँक खाती गोठवून काँग्रेसची आर्थिक कोंडी केली आहे. ‘हात-पाय बांधून निवडणूक लढवण्याची कबड्डी खेळा’, असे सांगितले जात आहे. सरन्यायाधीशांना वगळून निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचा कायदा बदलून मोदी सरकारने आपल्या मर्जीतील व्यक्तींची आयुक्तपदी नियुक्ती केली. अशा निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा करणार? येनकेनप्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी मोदी सरकार रडीचा डाव खेळत आहे”, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
“देशातील इन्कम टॅक्स कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत पक्षाला इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. मात्र, पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा ताळंबेद आणि व्यवहार हे पक्षांना व्यवहार निवडणूक आयोगाला सादर करावे लागतात. २०१७-१८ मध्ये काँग्रेसला काही देणग्या मिळाल्या होत्या. केरळमधील पुराच्या घटनानंतर पक्षाच्या सर्व खासदारांनी देशभरातून एक महिन्याचा निधी जमा करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविला होता. या गडबडीत पक्षाला मिळालेल्या देणग्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यायला आठवडाभर उशीर झाला. माहिती उशिरा झाला आता पक्षाला नोटीस पाठवून २१० कोटी रुपयांचा दंड बजावला आहे. हा दंड भरला नाही म्हणून विभागाने काँग्रेस पक्षाची चार बँकांतील ११ खाती गोठविली आहेत”, असं पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितले आहे.
“आता १० रुपयांचा व्यवहारही आम्हाला करता येणार नाही. विजयाचा आत्मविश्वास गमावलेले मोदी निवडणुकीत आमचा पराभव व्हावा म्हणून हे करत आहेत. ही कसली लोकशाही? सीताराम केसरी खजिनदार असतानाच्या काळात १९९४ मधील त्रुटीची नोटीस पक्षाला बजावण्यात आली आहे. आम्हाला न्याय मिळेल पण तोपर्यंत निवडणुका होऊन जातील त्याचे काय?”, असा सवाल यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, पक्षाने सांगितलं तर लढणार अन् जिंकणार”
-Baramati Lok Sabha: लेकीसाठी ‘बापमाणूस’ मैदानात; कार्यकर्त्याने बनवली चक्क चांदीची टोपी
-वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता
-‘रोहित, युगेंद्र पवारांवर दडपशाही होतेय, त्यांना सुरक्षा पुरवावी’; सुप्रिया सुळेंची मागणी