पुणे : पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या अभिवादन रॅलीला भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते, मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी रेसमध्ये असणारे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे हे अनुपस्थित राहिल्याने भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलं. दरम्यान, आज मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांच्या घरी जात भेट घेतली. त्यामुळे दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे बोलले जात आहे.
पुणे लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी यंदा चांगली रस्सीखेच झाल्याचं दिसून आलं. जगदीश मुळीक, संजय काकडे, माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे शिवाजी मानकर आदी नेत्यांमध्ये स्पर्धा होती. यामध्ये पुणे शहरात सर्वत्र परिचित असलेला चेहरा म्हणून ओळख असणारे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पारड्यात भाजपने उमेदवारीचे माप टाकले. त्यामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी दिसून आली, तर जगदीश मुळीक यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे देखील उलटसुलट चर्चांना उधाण आले.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी भाजपमधील सर्व नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आज सकाळीच त्यांनी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेत चर्चा केली. तर दुसरीकडे जगदीश मुळीक यांची भेट घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता मोहोळांची शिष्टाई कामाला येत जगदीश मुळीक लवकरच प्रचारात सक्रीय होणार का? हे पाहणे महत्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’
-मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही
-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा
-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त
-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा