पुणे : मनसेला वसंत मोरे यांनी ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर पुण्यात मनसेची हवा काहीशी कमी झालेली दिसून येत आहे. मात्र पुण्यात आपली हवा कायम ठेवण्यासाठी मनसेने कंबर कसल्याचं चित्र आता पहायला मिळतंय. कात्रज हा वसंत मोरे यांच्यामुळे मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता. पण त्यांनीच पक्षाचा राजीनामा दिला त्यामुळे मनसे कमकुवत बनली. मात्र आता मनसे पुन्हा कामाला लागली आहे. पक्ष सोडणाऱ्या वसंत मोरे यांना इशारा देणारे पोस्टर्स आता पुणे शहरात पहायला मिळत आहेत.
‘कात्रज मनसेचा बालेकिल्ला आहे, होता आणि राहिल’, अशा आशयाचे पोस्टर्स पुण्यात लावण्यात आले आहेत. मनसेचे पुणे शहर संघटक गणेश नाईकवाडे यांनी हा बॅनर कात्रजमधील विविध चौकांमध्ये लावला आहे. या बॅनरवर मनसेच्या स्थानिक नेत्यांचे आणि पदाधिकऱ्यांचे फोटो लावले आहेत. मनसे महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसेने आता आपला जम बसवायला सुरुवात केली आहे. त्यातच येत्या काळात मनसे एकत्र येऊन कदाचित वसंत मोरेंच्या विरोधात उभी ठाकणार असल्याचं या बॅनरवरुन दिसत आहे.
दरम्यान, वसंत मोरे यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याच्या चर्चा आहेत. ‘पक्षात माझा सतत अपमान होत आहे. माझ्या पक्षिष्ठेवर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. हे मला सहन होत नाही आहे’, अशी नाराजी व्यक्त करत वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ‘मला ग्रुप मधून काढून टाकताल पण पोरांच्या हृदयातून कसे काढणार’, अशी फेसबुक पोस्ट करत मोरेंनी मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यांची बदली; आता ‘हे’ असणार नवे पालिका आयुक्त
-‘तानाजी सावंत भावी मुख्यमंत्री’; पुण्यातील पोस्टरची सर्वत्र चर्चा
-‘अजित पवारांनी मोक्कापासून वाचवणं ही बाब धक्कादायक’; सुप्रिया सुळेंनी दादांना धरलं धारेवर
-राज्य पोलीस दलातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या
-उद्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या महत्वाची पत्रकार परिषद