पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘पवार नाव दिसताच बटण दाबा आणि मतदान करा’, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार अशा दोन गोष्टी असतात’, असं वक्तव्य केलं. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यावर आता सुनेत्रा पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांचं वक्तव्य ऐकून सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले.त्यानंतर आज सुनेत्रा पवार पुणे दौऱ्यावर असताना पुण्यात महायुतीचे पुणे जिल्ह्यातील ३ उमेदवारांनी मुरलीधर मोहोळ, आढळराव पाटील आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र प्रचार केला. यावेळी सुनेत्रा पवारांशी संवाद साधला असता त्या पुन्हा एकदा भावूक झाल्याचं दिसून आलं होतं.
“घरातील सगळी मोठी माणसंच सुनेची निवड करतात. तशी माझी निवड शरद पवारांनीच केली होती. बारामतीत अटीतटीची लढत वगरे काही नाही.नातं नात्याच्या जागेवर आहे. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. ही विचारांची लढाई आहे नात्याची नाही. बारामती तालुक्यातील सगळ्याच भागात फिरले. सगळ्यांच्या भेटी घेतल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. लोकांकडून मोठ्या प्रमाणात माझं स्वागत होत आहे. त्यामुळे मला सकारात्मक वाटत आहे. मला उमेदवारी मिळाली, ही बारामतीकरांची इच्छा होती. जनता हेच माजं कुटुंब आहे. जनता माझ्या पाठीशी उभी आहे” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आधी अश्रू अनावर अन् आज थेट जोडले हात; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांचं मौन कायम
-“तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार”; अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर निशाणा