पुणे : राज्यात बारामती मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळणार आहे. तक महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा अट्टहास केला आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार, खासदारांची आज मंगळवारी पुण्यात बैठक बोलवली आहे. दुपारी एक वाजता ही बैठक बोट क्लब येथे होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महायुतीचं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत अद्यापही गणित आखलं गेलं नाही. जागावाटपावरुन महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना शिंदे गटामधील तिढा कायम आहे. राष्ट्रवादीला देण्यात आलेल्या जागांवर महायुतीने उमेदवार जाहीर केले नाहीत. आजच्या बैठकीमध्ये अजित पवार हे आमदार, खासदार यांच्याशी चर्चा करत जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा करणार असल्याचं बोललं जात आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक लढणार आहेत. तर त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. ऐनवेळी बारामतीमध्ये महायुतीचा उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात घर खरेदीची संख्या वाढली; पुणेकरांची ‘या’ घरांना सर्वाधिक पसंती
-नर्सच्या हलगर्जीपणा नडला, रुग्णांना पोहचवलं थेट ICU मध्ये; आश्विनी जगतापांनी दिले कडक कारवाईचे आदेश
-टॉपलेस फोटोशूट : पावर्तीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षाचा टॉपलेस फोटो पोस्ट; नेटकऱ्यांची आक्रमक
-Loksbha Election | भाजपकडून कंगना निवडणुकीच्या मैदानात, या मतदारसंघातून देणार काँग्रेसला टक्कर