पुणे : राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा राजकीय घडामोडींना वेग येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाबाबत बोलणी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील विविध भागात दौरे करताना दिसत आहेत.
२०१९मध्ये शरद पवारांची साताऱ्यामधील सभा देशभर गाजली होती. आता गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात अनौपारिक गप्पांच्या कार्यक्रमात ही गोष्ट बोलून दाखवली होती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा हीच मागणी केली आहे. त्यावरील शरद पवारांचा प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी सध्या राष्ट्रवादीच्या राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रांग लागली आहे. बुधवारी याठिकाणी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी साताऱ्यातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साताऱ्यातून लढण्याचा आग्रह केला.
‘साहेब तुम्हीच साताऱ्यातून लढा’ त्यांच्या या वाक्यावर शरद पवार यांनी केवळ स्मितहास्य केले. त्यामुळे आता साताऱ्याची पावसातील गाजलेल्या सभेनंतर साताऱ्यात शरद पवारांच्या सभेने निवडणुकीला चार चांद लागले होते. तर श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला. यावरुनच आता साताऱ्यात शरद पवार नेमका काय डाव टाकणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या
-‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे
-“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना
-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला