पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आले असल्याची चर्चा आहे आयोगाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत.
त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता एमपीएससीकडून आतापर्यंत त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा अद्याप जाहीर केल्या नसून लवकरच पुढे ढकललेल्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या जातील.
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र. 133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/gob0HwVPSx
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) March 21, 2024
सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही, पक्षाने सागितलं तर राज्यात प्रचार करणार’- पंकजा मुंडे
-“विरोधकांना शिव्याशाप देऊ नका”; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना
-‘एक आमदार असणाऱ्या पक्षासाठी भाजप पायघड्या घालतंय’; रोहित पवारांचा भाजपला टोला
-Pune Loksabhe Election: ‘खासदार तर मीच होणार..’; वसंत मोरेंचा आत्मविश्वास