मावळ : मावळ मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली आहे. आपले मताधिक्य टिकवून ठेवण्यात बारणे यशस्वी झाले आहेत. आता नुकतेच सहाव्या फेरीचीही मतमोजणी झाली. मावळ मतदार संघाची सध्या सातवी फेरी पुर्ण झाली आहे. सहाव्या फेरीअखेर बारणे हे महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यापेक्षा 39 हजार 694 मातांनी आघाडीवर आहेत. तसेच सातवी फेरीपर्यंत श्रीरंग बारणे यांनी 44 हजार 689 मतांनी आघाडी घेतली आहे.
सातव्या फेरी अखेर श्रीरंग बारणे यांना 30 हजार 101 तर संजोग वाघेरे यांना 25 हजार 106 मते मिळाली आहेत. सातव्या फेरीपर्यंत एकूण बारणे यांना 220016 तर वाघेरे याना 175327 मते मिळाली. बारणे 44,689 मतानी आघाडी घेतली आहे.
सहाव्या फेरी अखेर बारणे यांनी 1 लाख 89 हजार 915 मते घेऊन 39 हजार 694 मतांची आघाडी कायम ठेवली. तर, संजोग वाघेरे हे 1 लाख 50 हजार 221 मते घेऊन कायम पिछाडीवर राहिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Baramati | बारामतीच्या लेकीचं पारडं झालं जड; सुनेला टाकलं मागे
-मुरलीधर मोहोळ सलग चौथ्या फेरीतही आघाडीवर; वाचा मोहोळ- धंगेकरांना मिळालेली मतांची आकडेवारी
-शिरुर लढतीमध्ये आढळराव पाटील की अमोल कोल्हे आघाडीवर? कोणाला किती मते पहा Live
-मावळमध्ये बारणे का वाघेरे आघाडीवर? पहा Live कोणाला किती मते?
-सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये काटे की टक्कर? तिसऱ्या फेरी अखेर कोणाची आघाडी? पहा live