पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान एक वक्तव्य केलं यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर आता बारामती लोकसभेच्या उमेदवार बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यात प्रचार करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. ‘देशाचे पंतप्रधान मोदी मंचावर असताना असं गलिच्छ वक्तव्य करणं योग्य नाही. मोदींचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे. मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
‘नरेंद्र मोदी पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. देशाची एक नागरिक म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे, की व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात केले आहे, त्याबाबत मोदींनी काहीतरी करावाई करावी राजकारण होत राहील, पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गेल्या वेळेस मोदी यांच्या समोर एक गलिच्छ वाक्य बोलणं झालं हे थांबलं पाहिजे. त्यांचा मी निषेध करते माझी अपेक्षा आहे मोदी याचा मानसान्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे अशी भाषा थांबली पाहिजे अशा व्यक्तींवर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी मोदींना केली आहे.
१९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेस ने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या… pic.twitter.com/05Z5ecyaEY
— Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar) (@SMungantiwar) April 8, 2024
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी! धंगेकरांचा प्रचार थांबवा, नेत्यांच्या शिवसैनिकांना सूचना
-“त्यांच्या हातात केंद्रातील काहीच नसेल तर ते तुमचा काय विकास करणार?”; अजित पवारांचा खोचक सवाल
-‘आधी बारामतीत शेवटची सभा व्हायची, मी तोंड उघडलं तर यांना…’; अजित पवारांचा विरोधकांना इशारा
-पुणेकरांच्या नळाला कोरड; महापालिकेकडे ४ दिवसांत ४०० तक्रारी